सुधीर भाऊंच्या स्मार्ट सिटी स्वप्नाची माती होणार??
* मूल येथे प्रस्तावित रेल्वे मालधक्का प्रकल्पास तीव्र विरोध
* सर्व पक्ष आणि सामाजिक संघटना एकवटले
मागील काही वर्षात वेगाने विकसीत होत असलेले, आणि स्मार्ट शहराचा लूक आलेले, भांऊच्या, म्हणजे राज्यांचे सांस्कृतीक कार्य व वने मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे मूल शहराच्या स्मार्ट सिटीचे स्वप्न मातीत मिसळणार काय? असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे.
त्याचे कारण म्हणजे, मूल शहरातील प्रस्तावित मालधक्का!
गडचिरोली जिल्हयातील, एटापल्ली तालुक्यातील माओवाद्यांच्या गडात सुरजागडची लोह खनिजांने समृध्द असलेली पहाडी आहे. या पहाडीवर 24 तास उत्खनन झाले तरी, 100 वर्ष पुरेल एवढा लोह खनिजाचा साठा आहे. असे म्हटल्या जाते की, जमशेदजी टाटा यांनी, टाटानगर वसविण्यांचे आधी त्यांनी, सुरजागड येथे लोह प्रकल्प करण्यांची चाचपणी केली होती, मात्र किर्र जंगल आणि पायाभूत सुविधाचा अभाव असल्यांने, त्यांनी टाटानगर वसविले.
सुरजागड येथील लोह खनिज उत्खननाचे अनेक प्रयत्न झाले. मात्र स्थानिकांनी ते हाणून पाडले होते. लोहनिर्मीतीचा प्रकल्प गडचिरोली जिल्हयातच झाला पाहिजे, असा आग्रह स्थानिक नेते, व्यापारी आणि आदिवासींनी घेतला. यासाठी विविध ग्रामसभेचे ठराव घेतले, पेसा अंतर्गत ठराव घेतले, त्यामुळे बराच काळ मुंबईच्या राज्यकर्त्याना इच्छा असूनही, लोह खनिज उत्खननाची लिज देता आली नाही. मात्र राज्यात 2014 मध्ये भाजपा-शिवसेनेची राज्यात सत्ता येताच, सुरजागड लोह खनिजांची लिज देण्यांसाठी वेगाने हालचाली सुरू झाल्यात, यासाठी स्थानिकांचा विरोध होवू नये म्हणून, कोनसरी येथे लाॅयड मेटल या कंपनीचे लोह निर्मीतीचे प्रकल्प होणार असल्यांचे जाहीर करण्यात आले. त्यासाठी कोनसरी येथे शेकडो एकर जागाही कंपनीने अधिग्रहीत केली. मात्र हा लोह निर्मीतीचा कारखाना तयार होण्यांआधीच, लोह खनिजांचे उत्खनन सुरू करण्यात आले. याला स्थानिकांनी आणि माओवाद्यांनी विरोध केला. मात्र सरकारने, आपली संपूर्ण ताकद लाॅयड मेटल्सच्या बाजूने उभे करीत, सुरजागड परिसराला पोलिस छावणीचे रूप दिले, पोलिस सरंक्षणात लोह खनिजाचे उत्खनन आणि वाहतूक सुरू झाली, माओवाद्यांनी काही जाळपोळ केली, त्यामुळे काही काळ या खदानीतून लोह उत्खनन थांबले होते, मात्र नंतर ते पुन्हा सुरू झाले, ते आजतागायत सुरू आहे. मिळालेल्या खात्रीशिर माहितीनुसार, आता लाॅयड मेटल कडून ही खदान अदानी ग्रुप कडे गेली आहे.
स्थानिकांच्या मागणीप्रमाणे, कोनसरी येथे लोह निर्मीतीचा तेवढा देखावा निर्माण केल्या गेला असून, प्रत्यक्ष तीथे आता काहीही होणार नाही तर, गडचिरोली जिल्हयातील सर्व नैसर्गीक संपत्तीच्या लाभाचे वाटेकरी, दुसरे राज्यच होणार हे स्पष्ट झाले आहे.
सुरजागड लोह खनिजाच्या वाहतूकीमुळे, एटापल्ली, आलापल्ली, नागेपल्ली, आष्टी या राष्ट्रिय महामार्गाची वाट लागली आहे. या खनिजाच्या वाहतूकीचे या सर्व भागातील जनता प्रचंड प्रभावीत झाली आहे, खनिज वाहतूकीचा त्रास नाकीनऊ आल्यांने, या भागातील व्यापार्यांनी अखेर बाजारपेठ बंदचा आंदोलन सुरू केले आहे.
सुरजागड येथील लोह खनिजाचे उत्खनन करून, कोनसरी येथे लोह निर्मीतीचा प्रकल्प करण्याऐवजी, कंपनी आता विविध राज्यात मोठ्या प्रमाणावर खनिजाची वाहतूक करण्यांची योजना तयार केली आहे, याच योजनेचा भाग म्हणजे, मूल येथील प्रस्तावित मालधक्का आहे.
मूल येथे मालधक्का झाल्यास, मूल शहरात ध्वनी, वायू, जल असे सर्व प्रकारचे प्रदुषण होणार आहे. रस्त्या-रस्त्यावर लोहखनिजांची भुकटी, हवेत लोहखनिज राहणार आहे. ‘राज्याला हेवा वाटेल असा मूल शहर’ करण्यांचा संकल्प करणारे आणि त्यादृष्टीने गतीने निर्णय घेवून, स्मार्ट बसस्थानक, स्मार्ट आठवडी बाजार, देखना कन्नमवार सभागृह, इतर तालुक्यांना हेवा वाटेल तसा इको पार्क, शहराला लाजवेल असा हेटी ते मूल शहराच्या सिमेंपर्यंतचा देखना महामार्ग तयार केले. या विकासाची दखल, विरोधही आवर्जुन घेतात, मात्र झालेला आणि भविष्यात होवू घातलेला स्मार्ट मूल शहराचे भाऊंच्या स्वप्नाची मालधक्याच्या निर्णयाने माती होणार काय? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
विजय सिध्दावार
9422910167, 7588883477
1 Comments
सुंदर
ReplyDelete