आदिवासी मजूर मजूरीपासून वंचित
श्रमिक एल्गार तीव्र आंदोलन छेडणार
जिवती तालुक्यातील आंबेझरी येथे फेब्रुवारी 2022 मध्ये रोजगार हमी योजनेवर तब्बल दोन महिने मजुरांनी बंधाऱ्यातील गाळ काढण्याचे काम केले मात्र आदिवासी मजुरांना डावलून इतर गैर-आदिवासी मजुरांची मजुरी देण्यात आली असल्याने सदर कामात गैरव्यवहार झाले असल्याचे मजूर सांगत आहेत. एकच कामावर गेलेले मजुरांमध्ये शासन भेदभाव करीत असल्याच्या आरोप श्रमिक एल्गार संघटनेचे उपाध्यक्ष घनश्याम मेश्राम यांनी केला असून वारंवार प्रयत्न करून सुद्धा प्रशासन दाद देत नसल्याने तीव्र निषेध नोंदविला आहे.
आंबेझरी येथील आदिवासी मजुरांनी मागील महिन्यात दिनांक 6/6/2022 ला जिवती तहसिल कार्यालयावर मोठया संख्येने जाऊन मजुरीची मागणी केली. मात्र अश्वासनापलेकडे त्यांना काहीच मिळाले नाही. अजूनही साधी चौकशी तहसिलदार व संवर्ग विकास अधिकारी यांनी केली नाही.
श्रमिक एल्गार च्या वतीने दिनांक 13/7/2022 ला जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन सदर प्रकरणाची चौकशी करून मजुरांना मजुरी देण्यात यावी याबाबत निवेदनातून कळविले होते मात्र जिल्हाधिकारी यांना सुद्धा मजुरांची तळमळ कळली नाही.
दिनांक 25/7/2002 ला पंचायत समिती जिवती येथे श्रमिक एल्गार चे उपाध्यक्ष घनश्याम मेश्राम, व आदिवासी मजूर मोठया संख्येने जाऊन संवर्ग विकास अधिकारी रेजिवाड यांना जाब विचारला असता रेजिवाड यांनी तात्काळ चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिले व संबंधित अधिकारी गायवाड यांना आदेश काढण्याचे निर्देश दिले व आदिवासी मजुरांची मजुरी मिळण्यासाठी जिल्हाधिकारी यांचे कडे पाठविलेली यादी मजुरांना देण्याचे निर्देश गायवाड यांना दिले मात्र गायवाड यांनी मजुरांना जाणूनबुजून नेटवर्क नाही, लाईन नाही, नेटवर्क चालत नाही असे दोन दिवसापासून करण देत मजुरांना यादी दिली नाही यावरून काही अधिकारी सुद्धा या प्रकरणात शामिल असल्याचे मजूर बोलत आहेत. व आदिवासी मजुरांसाठी शासनाकडे निधी उपलब्ध नसल्याचे सांगून मजुरांची दिशाभूल केली जात आहे.
मजुरांचे मस्टर चे यादीत काम केलेल्या लक्ष्मीबाई सिताराम कोरांगे व ताराबाई पैकू कोटनाके यांचे नावच नाही मग यांना मजुरी कशी मिळणार असा प्रश्न घनशाम मेश्राम यांनी उपस्थित केला असून काम न केलेल्या व्यक्तींचे नावे मस्टर च्या यादीत असून त्यांचे नावे मजुरी काढून गैरव्यवहार केले असतांना प्रशासन अजूनही कार्यवाही केलेली नाही. यावरून शासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न चिन्ह निर्माण झालेला असून आंबेझरी येथील मजुरांच्या प्रश्नांची दखल घेऊन आंबेझरी येथील रोहयो कामात झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करून गुन्हा दाखल करावा व आदिवासी मजुरांना त्यांच्या हक्काची मजुरी द्यावी अशी मागणी श्रमिक एल्गार केली आहे. मागील वर्षी सुद्धा रोहयो योजनेतून आदिवासी मजूर काम केले होते मात्र मागील वर्षी सुद्धा त्यांना मजुरी मिळाली नाही मात्र गेल्या वर्षी सदर मजुरांनी कुठलीही तक्रार केली नाही असे मजूर B.D.O. रेजिवाड यांना सांगत होते.
यावेळी खुशाल मडावी, पिसाराम मडावी, विठ्ठल मडावी, सुरेखा मडावी, रसिका मडावी, सीताराम मडावी, वनिता कोटनाके, गिता सलाम यासह अनेक मजूर उपस्थित होते.
0 Comments