माजरी गावातील महिलांनी दिला वेकोली कार्यालय समोर अन्न त्याग आंदोलनाचा इशारा

 

माजरी गावातील महिलांनी दिला वेकोली कार्यालय समोर अन्न

त्याग आंदोलनाचा इशारा





माजरी गावातील ताराबाई बहूद्देशीय मंडळ. या मंडळाच्या अध्यक्षा मंदा पाडूरंग निब्रड व सचिव वंदना अनिल सातपुते यांनी आज महिला शिष्टमंडळासहित जिल्हाधिकारी चंद्रपूर यांची भेट घेतली. सध्या सुरू असलेल्या पावसाळ्यात महापूरामुळे माजरी परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले असून गावकरी महिलांना मुलाबाळांसाठी चार दिवस माजरी रेल्वे स्टेशनवर काढावे लागले. माजरी येथील गावकऱ्यांचे भयानक नुकसान झाले असून यासाठी सर्वस्वी जबाबदारी माजरी एरिया येथील नागलून खुल्या खाणीचे मातीचे उंच ढिगारे आहेत. सदर ढिगारे शिर्णा नदी पात्रालगत असल्यामुळे नदीपात्रातील पाणी माजरी गावाकडे जास्त प्रवाहित होऊन महापूराची परिस्थिती निर्माण झाली आहे. मातीचे ढिगारे न हटविल्यास भविष्यात पुन्हा पूर येणार आणि जिवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

माजरी गावात आतापर्यंत कोणत्याही अधिकाऱ्यांनी किंवा नेत्यांनी भेट दिलेले नाही किंवा नुकसान भरपाई मिळाली नाही.

वेकोली मार्फत एकतर मातीचे ढिगारे हटविण्यात यावे किंवा गावाचा पुनर्वसन करण्यात यावा अशी मागणी उपस्थित महिलांनी उपजिल्हाधिकारी मेश्राम यांच्याकडे केली. यावेळेस आर.डी.सी. मेश्राम ‘यांनी तात्काळ पाहणीसाठी तहसीलदार भद्रावती यांना निर्देश देतो’ असे आश्वासन देतो. मागणी पूर्ण न झाल्यास वेकोली कार्यालय समोर अन्न त्याग आंदोलनाचा इशारा दिला.





Post a Comment

1 Comments

  1. १९९३ ला वर्धा, वैनगंगेला महापूर आला होता. वर्धा नदी काठावरील बरीच गावे पाण्याखाली होती. पिपरी, माजरी सह अन्य गावे.तेव्हा हे सर्व घडलय ते वेकोली ने मातीचे ठिगारे योग्य ठिकाणी डम्प न केल्याने यावर एकमत झाले होते.पण कोणत्याही राजकीय पक्षाने याचा सलग-कठोरपणे पाठपुरावा केला नाही.त्यामुळे काही काळ चर्चा फक्त झाली. नंतर सारे काही शांत.पुरामुळे बाधित झालेल्या प्रत्येक गावाचा तेव्हा मी बीडीओ असल्याने दौरा केला होता.प्रश्न अजूनही कायम आहे.राजकीय पक्षांचे हित संबंध ,याबाबत काही न करण्याबाबत आड येतात. मग लोकल खासदार केंद्रात मंत्री असू दे.त्यांचे हितसंबंध काय आहे हे सर्वश्रृत आहे.लोकांचा दबाव वाढत नाही.त्यांचे वतीने कोणी सबळ जनलढा, जनहित याचिका करत नाही तोपर्यंत हे असेच सुरू राहणार......राजगडकर प्रभू

    ReplyDelete

Write for The Vidarbha Gazette!