हवामान बदल आणि आपण
जंगलतोड,शहरीकरण ,प्रदूषण आणि वाढलेली लोकसंख्या ह्यामुळे संपूर्ण जगात पर्यावरणाच्या अनेक समस्यांना आपण तोंड देत आहोत. पृथ्वीचे सरासरी तापमान वाढले,हवामान बदल झाला आणि त्यातून अति पावूस,कमी पावूस,उष्ण आणि थंड लहरी ,समुद्र पातळीत वाढ,हिमनग वितळणे अश्या अनेक नैसर्गिक आपत्तीत वाढ होऊ लागली आहे.विकासाच्या नावावर निसर्गाची प्रचंड नासधूस झाली,प्रदूषण वाढले आणि त्यामुळे तापमान वाढ झाली,त्यामुळे आज जीवन जगणे कठीण झाले आहे.ह्याच पार्श्वभूमीवर युनायटेड नेशन तर्फे २०१५ म्ध्ये पेरीस अग्रीमेंट करण्यात आले.
पुढील आठड्यात ग्लासगो येथे युनायटेड नेशन च्या COP26 ही हवामान बदलावर आयोजित अंतरराष्ट्रीय परिषद होऊ घातलेली आहे. ह्या परिषदेसाठी स्वाक्षरी केलेल्या १९२ देशांनी शून्य कार्बन उत्सर्जन करण्यासाठी आश्वासन आणि कृती आराखडा सादर करावयाचा आहे. ह्या तहानुसार जागतिक सरासरी तापमान 2 डिग्रीच्या आणि आणि १.५ आंत ठेवायचे असून ह्यासाठी आपल्या देशातील हरित गृह वायूंचे उतसार्जन कमी करायचे आहे. चीन ने इ.सन २०६० वर्ष हे शून्य कार्बन उत्सर्जनाचे वर्ष तर अमेरिकेने २०५० हे वर्ष ठरविले आहे,भारताने अजून युनोला वर्षाची मर्यादा आणि कृती कार्यक्रम सांगितला नाही.
हवामान बदलाचे परिणाम- गेल्या तीन दशकापासून भारतात हवामान बदलाच्या घटना घडू लागल्या आहेत. तापमान वाढीमुळे ध्रुवावरील आणि हिमालयावरील बर्फ वितळू लागले ,समुद्राची पातळी वाढू लागल्याने विस्थापनाच्या समस्या भेडसावू लागल्या,देशांत उष्ण आणि थंड लहरीचे प्रमाण वाढले ,देशाच्या पूर्व पश्चिम किनार्यावर येणार्या वादळाचे प्रमाण वाढले,अति पावूस आणि ढगफुटीच्या घटना वाढल्या , मोनसून लहरी झाला ,शेतीचे प्रचंड नुकसान झाले,हवामान बदलामुळे कोरोना साराखे विषाणू येवू लागले आणि एकूणच जीवन जगणे
असह्य होऊ घातले आहे. हे सर्व परिणाम निसर्गाची नासधूस आणि नैसर्गिक साधन संपत्तीचा अतिशय वापर केल्यामुळे झालां आहे.आजच आपण सावरलो नाही तर हा विनाश पुढे वाढत जाईल.
हवामान बदल आणि चंद्रपूर – चंद्रपूर हा औध्योगिक जिल्हा असून येथे जागतिक हवामान बदलासाठी पोषक स्थिती आहे.जागतिक तापमान वाढीसाठी हरित गृह वायू जिम्मेदार असून हे वायू थर्मल पॉवर स्टेशन ,सिमेंट उद्योग आणि कोळसा खाणी मधून उत्सर्जित होतात. चंद्रपूर हे मागील ८ वर्षापूर्वी देशात ३ ऱ्या क्रमांकाचे प्रदूषित शहर होते ह्यावरून चंद्रपूरच्या प्रदूषणाची व्याप्ती कळू शकते. येथील थर्मल पावर स्टेशन आणि कोळसा आधारित ऊर्जा हीच प्रामुख्याने हवामान बदलासाठी कारणीभूत आहे.हवामान बदलासाठी चंद्रपूरचे योगदान आहे हे साऱ्या जगाला माहिती झाले त्यामुळेच दरवर्षी देश विदेशातील स्वयंसेवी संस्था आणि पत्रकार चंद्रपूरला भेटी देतात आणि इथला अभ्यास करतात.
फ्रांस-५ आणि बीबीसी चंद्रपुरात – फ्रांस-५ आणि बीबीसी हे जगातील दोन प्रमुख न्यूज चेनलचे प्रतीनिधी चंद्रपूर मध्ये येतात ह्यातच चंद्रपूर हे हवामान बदलाच्या कारणासाठी किती जबाबदार आहे हे लक्षात येते. भारतातील पर्यावरणाची स्थितीचा अभ्यास करून विदेशातील पत्रकार चंद्रपूरला येतात. ह्यातूनच त्यांनी माझ्याशी संपर्क केला. आणि त्यांनी चंद्रपुरातील कोळसा खाणी,उद्योग,वीज निर्मिती केंद्रे आणि रोजगार ह्यांचीही माहिती घेतली. कोळसा आनि हवामान बदल हा त्यांच्या डाँक्युमेंटरीचा विषय होता.त्यांना मी घुग्गुस येथील कोळसा खाणी,चंद्रपूर शहरालगतच्या खाणी,चंद्रपूरचे थर्मल पोवार स्टेशन आणि त्यातून निर्माण होणारे प्रदूषण दाखविले. त्यांना कोळसा आधारित येथील रोजगार ह्या बधल सविस्तर माहिती दिली.भारत देश येत्या १० वर्षात कोलाश्यावर आधारित वीजनिर्मिती कमी करेल आणि सौर ऊर्जेकडे देश जाईल हे मी ठासून सांगितले.नागरिक सुधा पेट्रोलच्या वाहणा ऐवजी बेटरी वर चालनारी वाहने वापरीत आहेत,बहुतेक नागरिक घरावरील सौर ऊर्जा वापरीत आहेत हे सुद्धा मी त्यांना सांगितले.हि सकारात्मक बाजू खरा तर त्यांना माहिती नव्हती.
शासनाची भूमिका – भारताने आधीच पँरीस करारावर सह्या केलेल्या आहेत आणि येत्या COP26 ह्या परिषदेसाठी भारताला कोणत्या वर्षीपर्यंत शून्य कार्बन उत्सर्जन करायचे आहे ते आश्वासन द्यायचे आहे. ह्यासाठी भारताने पुढील काही वर्षात कोळसा आधारित ऊर्जा उत्पादन हळूहळू कमी करायचे आहे,आणि प्रदूषण सुद्धा कमी करायचे आहे.ह्यासाठी शासनाने केवळ युनायटेड नेशन्स ला पोकळ आश्वासान न देत्या जमिनीवर कामे करायचे आहे.तरच जागतिक पातळीवर वायू प्रदूषण आणि तापमान कमी होऊ शकेल.
नागरिकांची कर्तव्ये – देशातील प्रदुशनासाठी जेवढे शासन ,प्रशासन आणि उद्योग जबाबदार आहे तेवढेच नागरिक सुद्धा जबाबदार आहे.आउटडोर पोल्लूषण सोबत इंडोर पोलूषण सुधा आहे. नागरिकांनी कचरा जाळणे थांबवावे,पेट्रोल-डिझेलची वाहने वापरणे थांबवावे,सायकल वापरणे सुरु करावे, आपली वाहने न वापरता पब्लिक ट्रान्स्पोर्ट वाहने वापरावी,घरी वायू,जल प्रदूषण होणार नाही त्यासाठी प्रयत्न करावे,,आपल्या सवई बदलाव्या,प्रदूषण करणाऱ्या उद्योगाविरुद्ध आवाज उठवावा,शासन प्रशासनाला धारेवर धरावे अशी अनेक कामे केली तर शहरात प्रदूषण होणार नाही.परंतु असे होताना दिसत नाही.केवळ सर्व कामे शासनानेच करावी आणि आपली काहीच जिम्मेदारी आणि कर्तव्ये नाही ही भूमिका बरोबर नाही.जर जागतिक पातळीवर प्रदूषण आणि हवामान बदल कमी करावयाचा असेल तर वैयक्तिक पातळीवर सुद्धा कार्य आणि प्रयत्न करावे लागेल.
प्रा. सुरेश चोपणे ,चंद्रपूर
9822364473
1 Comments
The Vidarbha Gazette is gaining more redership and support.Thanks for the opportunity to contribute..My best wishes
ReplyDelete